‘धक्का दिला, त्याने दाबलं, मी ओरडत राहिली पण…’, मुनव्वर फारुकी याच्या एक्स गर्लफ्रेंडचं धक्कादायक वक्तव्य
मुंबई : ‘बिग बॉस 17’ च्या घरात अशा काही घटना घडल्या, ज्या कायम स्पर्धकांच्या आणि चाहत्यांच्या लक्षात राहतील. ‘बिग बॉस 17’ शोची ट्रॉफी मुनव्वर फारुकी याने जिंकली आहे. बिग बॉसच्या घरातील आणि मुनव्वर याच्या आयुष्यातील प्रवास सोपा नव्हता. आता मुनव्वर याची एक्स गर्लफ्रेंड आयेशा खान हिने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला आहे. आयेशा खान हिने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंगाचा खुसाला केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयेशा हिची चर्चा रंगलेली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत आयेशा हिने वयाच्या 9 व्या तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं आहे. सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ ढसा-ढसा रडत अभिनेत्रीने एका काकांनी तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितलं…
आयेशा खान म्हणाली, ‘एका काका आले आणि त्यांनी मला हाक मारली. मी त्यांना विचारलं काय झालं काका? त्यांच्याकडे एक पत्ता होता. त्यांनी मला पत्ता विचारला… मी त्यांना रस्ता सांगितला… तेव्हा मला म्हणाले, मला या पत्त्यापर्यंत सोडशील का? मी कोणताच विचार न करता त्यांना होकार दिला आणि त्यांच्यासोबत गेली.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही बिल्डींगपर्यंत पोहोचलो. मी पहिल्या मजल्यावर त्यांना घेऊन गेली. त्यानंतर मी खाली उतरत असताना त्यांनी मला घट्ट पकडलं आणि माझ्यावर बळजबरी करु लागले. तेव्हा काय होतय मला काहीही कळत नव्हतं. 9 वर्षांच्या मुलीला काय कळणार आहे. पण काही वाईट होतंय एवढं कळलं होतं…’
‘मी मोठ्याने ओरडत होती… त्या माणसाने मला धक्का दिला… मला दाबून ठेवलं… पुन्हा माझ्या बळजबरी करायला सुरुवात केली… मी ओरडत होती, माझी आई मला समोर दिसत आहे मला जाऊ द्या… पण तेव्हा देवाची कृपा झाली आणि तो माणूस मला म्हणाला, कुठेही जाऊ नको इथेच थांब… ज्या क्षणी तो माणूस गेला आणि मी पळ काढला…’ लहानपणी घडलेली धक्कादायक घटना सांगताना आयेश प्रचंड रडत होती.