जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
वाशिम, दि. 26 (जिमाका) : 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, श्री. व्यवहारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, अधीक्षक राहुल वानखडे, नायब तहसीलदार सुनील घोडे, सविता डांगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, विधी अधिकारी महेश महामुने, माजी सैनिक, विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राणी लक्ष्मीबाई शाळेचे शिक्षक मोहन शिरसाठ यांनी केले. यावेळी तंबाखु मुक्तीची उपस्थितांना शपथ देण्यात आली.