महाराष्ट्र ग्रामीण

50 वर्षानंतर कुंभ राशीत तयार होत आहे त्रिग्रही योग, राशीचक्रात अशा घडतील घडामोडी

मुंबई : गोचर कालावधीनुसार शनि हा सर्वात मंद गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घडतो. त्यात इतर ग्रहांचा गोचर कालावधी वेगवेगळा आहे. आता हे सर्व गणित पाहता एका राशीत ग्रह प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्र येतात. आता असाच एक योग 50 वर्षानंतर जुळून आला आहे. कुंभ राशीत शनिदेव 30 वर्षांनी आले आहेत आणि अडीच वर्षानंतर मीन राशीत गोचर करतील. तत्पूर्वी कुंभ राशीत तीन ग्रह एकत्र येणार आहे. 50 वर्षानंतर हा योग जुळून येणार आहे. तीन ग्रह एकत्र येणार असल्याने त्रिग्रही योग तयार होणार आहे. मार्च महिन्यात धन आणि वैभवदाता शुक्र ग्रह आणि बुद्धिदाता बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्रिग्रही योगाची स्थिती निर्माण होणार आहे. 7 मार्च ते 26 मार्च दरम्यान बुध ग्रह या राशीत राहील. तर शुक्र ग्रह 7 मार्च ते 31 मार्चपर्यंत या राशीत असेल. त्यामुळे जवळपास 19 दिवस त्रिग्रही योग जुळून येणार आहे. या स्थितीचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या..

कुंभ : या राशीच्या जातकांना तीन ग्रहांचं एकत्रित बळ मिळणार आहे. लग्न स्थानात तीन ग्रह एकत्र येणार असल्याने आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल. त्या कामात हात टाकाल ते काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. समाजात मानसन्मान मिळेल. तसेच व्यवसायात अपेक्षित अशी प्रगती गाठू शकाल. आर्थिक स्थिती सुधारल्याने कौटुंबिका पातळीवर आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.

वृषभ : गोचर कुंडलीच्या कर्मस्थानात त्रिग्रही योग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. उद्योगपतींना कामात प्रगती दिसून येईल. तसेच व्यापाऱ्याचा विस्तार करण्यासाठी हा अवधी उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. तसेच इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल.

मिथुन : या राशीच्या नवव्या स्थानात तीन ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत नशिब जोरात असेल. एखादी गोष्ट हाती घेतली की ती पूर्णत्वास जाईल यात काही शंका नाही. देशविदेशात व्यवसायाचा विस्तार करू शकता. तसेच अध्यात्मिक प्रगती या कालावधीत होऊ शकते. प्रेमप्रकरणात यश मिळेल. तसेच लग्नाचा प्रस्ताव मान्य केला जाईल. घरात आनंदी वातावरण राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button