AFG vs SL : अँजेलो मॅथ्यूजने चौकार मारला खरा पण एक चूक नडली, थेट मैदानातून पडावं लागलं बाहेर Watch Video
मुंबई : श्रीलंका अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात श्रीलंकेने सर्वबाद ४३९ धावा करत २४१ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे अफगाणिस्तानला ही आघाडी मोडीत काढून विजयासाठी धावा देण्याचं आव्हान आहे. असं सर्व असताना या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊटमुळे चर्चेत आला होता. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात उशिरा मैदानात आल्याने विकेट गमवावी लागली होती. त्यानंतर बराच वादंग झाला होता. आता मॅथ्यूजची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.कारण मॅथ्यूज या सामन्यात विचित्र पद्धतीने बाद झाला. त्यामुळे निराश होत त्याला जमिनीवर बसण्याची वेळ आली. कोलंबोत दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यासाठी अवघ्या १७ चेंडूचा खेळ बाकी होता आणि तेव्हाच हा प्रकार घडला.
अँजोलो मॅथ्यूज स्ट्राईकवर असताना अफगाणिस्तानकडून कैश मोहम्मद षटक टाकत होता. षटकाचा दुसरा चेंडू खेळपट्टीच्या एकदम बाहेर जात होता. त्यामुळे या संधीच्या फायदा घेण्यासाठी मॅथ्यूजने जोरदार प्रहार केला. चेंडू सीमारेषेवर जाऊन आदळला. चौकार मिळणार असं वाटत असताना मॅथ्यूज मैदानावर हताश होऊन बसला होता. कारण फटका मारताना मॅथ्यूजची बॅट स्टम्पवर आदळली होती. मॅथ्यूज १४१ धावांवर हिट विकेट झाला.
मॅथ्यूजने जवळपास सहा तास अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा घाम काढला होता. २५९ चेंडूंचा सामना करत १४१ धावांची खेळी केली. दीडशे धावा आरामात होऊ शकल्या असत्या. पण एक चूक महागात पडली. मॅथ्यूजने क्रिकेट कारकिर्दीतलं १६ वं शतक ठोकलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): इब्राहिम झद्रान, नूर अली झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नासिर जमाल, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), झिया-उर-रेहमान, कैस अहमद, निजात मसूद, मोहम्मद सलीम साफी, नवी झदरन
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), चमिका गुणसेकरा, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, असिथा फर्नांडो