दुसरी कसोटी जिंकल्यावरही ‘या’ खेळाडूंना बाहेरचा रस्ता?, टीम मॅनेजमेंटम मोठा निर्णय घेणार!
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामधील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमधील दोन सामने झाले आहेत. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असून मालिका बरोबरीत साधली आहे. आता तिसरा कसोटी सामना गुजरातमधील राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. संघात नेमके कोणते बदल होऊ शकतात जाणून घ्या.
टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला असला तरीसुद्धा संघात बदल होणार हे निश्चित आहे. कारण हा सामना जिंकला असला तरी काही खेळाडूंना प्लेइंग 11 मधून बाहेर काढण्यात येणार आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये के. एल. राहुल आणि रविंद्र जडेजा माघारी परतणार असल्याची माहिती समजत आहे. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले होते. या खेळाडूंच्या जागी ज्यांना संधी मिळाली त्यांनीही काही चमकदार कामगिरी केली नाही.
दोन युवा खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून रजत पाटीदार आणि मुकेश कुमार आहेत. तीन सामन्यांसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार आहे. तिसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजसुद्धा कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शुबमन गिल याचंही स्थान धोक्यात होतं मात्र दुसऱ्य कसीटीमध्ये शतकी खेळी करत गिलने टीकाकारांना उत्तर दिलं. त्यामुळे आता रजत पाटीदार याला डच्चू मिळण्याची जास्त शक्यता आहे. बीसीसीआय येत्या शुक्रवारपर्यंत कसोटी स्क्वॉड घोषित करण्याची जास्त शक्यता आहे.
दरम्यान, विराट कोहली तिसऱ्या आणि चौख्य कसोटीलाही मुकणार असल्याची चर्चा होत आहे. अनुष्का आणि विराट आणखी एकदा आई-बाबा होणार आहेत. कोहलीपाठोपाठ आता जसप्रीत बुमराह याच्या खेळण्याबाबत शंका आहे. जसप्रीत बुमराहला दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं.