महाराष्ट्र ग्रामीण

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, आता महेश गायकवाड यांचीदेखील चौकशी होणार

मुंबई: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संबंधित घटना ही जागेच्या वादातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व 70 जणांवर जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयात चार जणांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने शिरून, जागेवरील कामगारांना शिवीगाळ करत, जागेतील सामानाचा नुकसान केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय.

आमदार गणपत गायकवाड यांच्या ठेकेदारांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात प्रामुख्याने महेश गायकवाड, त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यासह अक्षय गायकवाड, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव यांची नावे एफआयआर कॉपीमध्ये देण्यात आली होती. याप्रकरणी उल्हासनगर चोपडा कोर्टात यामधील चौघांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यांना जामीन मिळाल्या असल्याची माहिती संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मात्र या गुन्ह्यात अजूनही महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह 66 जण फरार आहेत. यातील महेश गायकवाड आणि राहुल पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी इतर 66 जणांची चौकशी सुरू केली आहे. आत्तापर्यंत पाच जणांची चौकशी याप्रकरणी करण्यात आली आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत, अशीदेखील माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button