खेळ

IND vs ENG 2nd Test | कॅप्टन रोहित शर्मासाठी वाईट बातमी, हिटमॅन नावाला लागला कलंक, नेमकं काय झालं?

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. टीम इंडियाचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी गडगडलेला पाहायला मिळाला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी 255 धावांवर टीम इंडियाला ऑल आऊट केलं. आता दोन दिवस बाकी असून इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी 332 धावांची गरज आहे. तर रोहित अँड कंपनीला इंग्लिश संघाला ऑल आऊट करायचं आहे. आजच्या दिवशी परत एकदा कॅप्टन रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहित फक्त आऊट नाही झाला तर एका वाईट विक्रमाचा मानकरी ठरला आहे.

रोहित शर्माने पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 13 धावा केल्या होत्या. अँडरसनने रोहितला बोल्ड केलं, रोहित कसोटी फॉरमॅटमध्ये बोल्ड आऊट होण्याची ही 16 वी वेळ ठरला. महत्त्वाचं म्हणजे रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसन याने सर्वाधिकवेळा आऊट केलं आहे. याआधी अँडरसन याने रोहितला 2021 ला लॉर्ड्समध्ये बोल्ड केलं होतं.

रोहित शर्मा ठरला वाईट विक्रमाचा मानकरी

रोहित शर्मा याने आतापर्यंत या मालिकेत चारवेळा बॅटींग केली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने गेल्या आठ डावांमध्ये एकही सिक्सर मारला नाही. रोहितने याआधी 2014 मध्ये सात डावांमध्ये बॅटींग केली होती आणि तेव्हाही त्याला या डावांमध्ये एकही सिक्सर मारता आला नाही.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने पहिल्या डावात  396 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड संघ 253 धावांवर ऑल आऊट झाला.  दुसऱ्यांदा फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 255 धावांवर गडगडला. पहिल्या डावामधील आघाडी असल्याने आता इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी 399 धावा करायच्या आहेत. तर टीम इंडियाला दहा विकेट घ्यायच्या आहेत. कसोटीला आणखी दोन दिवस बाकी आहेत.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button