महाराष्ट्र ग्रामीण

ज्या पवारांनी मोठं केलं, त्यांचंच मरण चिंतता म्हणणाऱ्या आव्हाडांच्या टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. या वक्तव्यावरून शरद पवार गटाने अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवार हे शरद पवार यांच्या मृत्यची वाट पाहत आहेत का? असा खोचक सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाल्यावर अजित पवार यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

आगामी लोकसभा निवडणुक ही आमची शेवटची निवडणूक आहे, असं सांगून काही लोकं तुम्हाला भावनिक करतील. पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे हे मला माहित नाही. परंतु तुम्ही भावनिक होऊ नका. मी देईल त्या उमेदवाराला मतदान करा, असं अजित पवार म्हणाले होते. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी पवारांवर निशाणा साधला होता.

जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

ज्या पवारांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांचंच मरण चिंतत आहात म्हणून आव्हाडांनी टीका केलीय. दुष्मणाचाही बाप मरू नये असे म्हणणारे आती कोणी नांगरली तिची मशागत केली, आणि कोणी कुणाच्या हातात दिली. तिथं भावनिक आवाहन करतील म्ही आणि अजित पवारांनी तर सर्व हद्द ओलांडली. बारामतीत लहान पोरांनाही माहीत आहे ही बारामतर नाही त्या ठिकाणी बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवारांचं स्पष्टीकरण

काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर जितेंद्र आव्हाड काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button