महाराष्ट्र ग्रामीण

‘मी त्याच्यासारखा खालच्या दर्जाचा नाही’, मनोज जरांगे थेट कोणाबद्दल असं बोलले?

“सालेर किल्ला रस्त्यात लागतो, तिथे दर्शनाला जाणार आहे. बालेकिल्ला, फालेकिल्ला कोणाचा नसतो, काय संबंध? नाशिक जनतेचा बालेकिल्ला आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील सध्या दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल ते म्हणाले की, “छगन भुजबळ राजीनामा देणारे नाहीत, घेणारे आहेत. भुजबळांनी राजीनामा द्यावा की, नाही द्यावा यात मी पडणार नाही. मी त्याच्यासारखा खालच्या दर्जाचा नाही” “छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी. तो गोरगरीब लोक आहेत. त्यांचेच आहेत. माफी मागितली नाही, तर मी अपमान केला, आता मी माफी मागणार नाही. मग्रुर आहे असा अर्थ निघतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मी 10 तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर मंगळवारी-बुधवारी होणारी कॅबिनेट सोमवारी झाली. त्यांनी निर्णय घेतला, अशी ऐकीव माहिती आहे. राजपात्रित अधिसूचना काढली. ओबीसींना आरक्षण देणाऱ्या 2021 च्या कायद्यात दुरुस्ती करावी. एवढच आमच मत आहे. येत्या विशेष अधिवेशनात अध्यादेशाच कायद्यात रुपांतर करुन अमलबजावणी करावी म्हणून उपोषणाला बसणार आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

राज ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले नाशिकच पाणीच तसं

नवी मुंबईत विजयोत्सव साजरा केला, मग आता मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याची वेळ का आली? अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या पाठिशी मराठा समाजाची पोर आहेत. नाशिकच पाणीच तस आहे. ते तेवढ्यापुरता बोलले असतील, आता त्यांची भूमिका बदलेलं”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button