महाराष्ट्र ग्रामीण

महेश गायकवाड यांची प्रकृती कशी? डॉक्टरांकडून टेन्शन वाढवणारी Update

Ganpat Gaikwad Firing | पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारात शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता महत्त्वाची माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबाराची ही घटना घडली होती. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांसमोर सहा गोळ्या झाडल्या. आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण आणि जागेच्या वादातून हा गोळीबार झाला होता. महेश बरोबर राहुल पाटील हे सुद्धा गोळीबारात जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या. जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे.

गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली. हत्या करण्याच्या उद्देशाने एकापाठोएक असे सहा राऊंड फायर करण्यात आले. महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या बाहेर काढल्या. महेश गायकवाड यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळलेला नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलय, अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.

“मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता” अस गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. “काल संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील, तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला” असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button