Ratan Tata यांचं स्वप्न अखेर पूर्ण! अनेक दिवसांपासूनच्या इच्छेला मूर्त रुप
नवी दिल्ली: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आहे. अनेक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग पण आहे. पाळीव प्राणी, भटके प्राणी यांच्याविषयी त्यांना कणव आहे. त्यांच्याविषयी काही तरी करण्याची त्यांची अनेक दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्राण्यांसाठी एक दवाखाना सुरु करण्याचे त्यांच्या मनात होते. आता मुंबईत हे हॉस्पिटल थाटण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांसाठी त्यांनी समाज माध्यमांवर मदतीचे अनेकदा आवाहन केलेले आहे. आता प्राण्यांवर उपचार करण्यासाठी विशेष हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
मुंबईत पशू रुग्णालय
मुंबईत हे पशू रुग्णालय बांधून तयार झाले आहेत. हे रुग्णालय 2.2 एकरवर उभारण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 165 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हे रुग्णालय येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पशूंवर उपचार करेल. या हॉस्पिटलमध्ये कुत्रे, मांजरी, ससा आणि इतर छोट्या प्राण्यांवर 24×7 तास उपचार होतील. महालक्ष्मी परिसरात टाटा ट्रस्ट्स स्मॉल एनिमल हॉस्पिटल दिमाखात उभे राहिले आहे.
काय व्यक्त केल्या भावना
या हॉस्पिटलचे उद्धघाटन व्हायचे आहे. त्यापूर्वी टाटा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली आहे. त्यात, ‘ एक पाळीव प्राणी हा कोणत्या ना कोणत्या कुटुंबाचा सदस्य असतो. पूर्ण जीवनात पाळीव प्राणी यांची सुरक्षा आणि त्यांच्यासाठी रुग्णालयाची गरज याची मला जाणीव होती.शहरात एक हायटेक पशू स्वास्थ्य केंद्र गरजेचे होते. ते पूर्ण होत असल्याने मला आनंद झाला आहे’ असे ते म्हणाले.
श्वान प्रेमी म्हणून ओळख
रतन टाटा हे श्वान प्रेमी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे सर्व जातीचे कुत्रे आहेत. पण रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांविषयी त्यांना विशेष आत्मियता आहे. त्यांनी यापूर्वी भटक्या कुत्र्यांसाठी निवारा उभारण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी एका कुत्र्याचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. हा कुत्रा हरवलेला असून त्याच्या मालकाने तो घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हा कुत्रा मुंबईतील त्यांच्या मुख्यालयात कुत्र्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे.
भटक्या कुत्र्यांशी मैत्री
उद्योगपती रतन टाटा यांना कुत्र्यांबदद्ल जिव्हाळा आहे. ते डॉग लव्हर आहेत, हे जगजाहीर आहे. भटक्या कुत्र्यांसाठी ते काम करतात. त्यातील अनेक कुत्रे त्यांच्याकडे आहेत. ते भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मोठी रक्कम दान करतात. गोव्यातील एका रस्त्यावर भटक असलेला कुत्रा त्यांनी सोबत घेतला. आज तोच त्यांचा सर्वात लाडका कुत्रा आहे. तो अनेकदा त्यांच्यासोबत दिसतो.
इतरही रुग्णालय उभारले
टाटा ट्रस्टने यापूर्वी पण भारतात दवाखाने, रुग्णालये उभारली आहेत. त्यात कँसर रुग्णांसाठीचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, एनसीपीए, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-बेंगळुरु यांचा समावेश आहे.