अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मेळावा
एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे काम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने केले आहे.
सातारा : ( प्रतिनिधी सागर पवार) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळावा आज उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यास त्यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे काम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने केले आहे. याबद्दल महामंडळाचे यावेळी अभिनंदन केले. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा महामंडळाने यासाठी केला आहे. यात जवळपास ८२५ कोटी रुपये इतका व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगले योगदान दिले असून मराठा समाजातील नवउद्योजकांना मोलाचे सहकार्य महामंडळाच्या माध्यमातून होत आहे, याचे समाधान आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.
यावेळी सातारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. तसेच याप्रसंगी लाभार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्रजी पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा. महेशजी शिंदे, आमदार मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मा. जयकुमारजी गोरे, माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण उद्योजक व नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.