परभणी जिल्हामहाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेष

बदल हवाच खाली नव्हे राज्यात अंबीका डहाळे यांची पत्रकार परिषद : विरोधकांवर टीका

राज्यात बदल गरजेचा ठरला आहे, असे मत शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या तथा महिला आघाडीच्या परभणी विधानसभा संघटक माजी नगरसेविका अंबीका अनिल डहाळे यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेतून व्यक्त केले

बदल हवाच खाली नव्हे राज्यात अंबीका डहाळे यांची पत्रकार परिषद : विरोधकांवर टीका

    परभणी : (प्रतिनिधी गजानन साबळे)  आगामी विधानसभा निवडणूकीतून परभणीत नव्हे, राज्यात बदल गरजेचा ठरला आहे, असे मत शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या तथा महिला आघाडीच्या परभणी विधानसभा संघटक माजी नगरसेविका अंबीका अनिल डहाळे यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेतून व्यक्त केले. आगामी निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी परभणीत बदल हवा असा सूर आळवून स्थानिक लोक प्रतिनिधींवर टिका टिप्पणीचे कुटीर उद्योग सुरु केले आहेत. ते प्रकार म्हणजे अक्षरशः बालबुध्दीचे लक्षण आहे, अशी परखड टिका सौ. डहाळे यांनी व्यक्त करतेवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींवर टिका टिप्पणी करतेवेळी विरोधकांनी वस्तुस्थिती काय आहे, याचे भान राखले पाहिजे. परभणी या जिल्हा स्थानच्या बसपोर्टचे काम हे रखडलेले नाही, ते अंतीम टप्प्यात आहे, असे स्पष्ट करतेवेळी डहाळे यांनी बसपोर्ट प्रमाणेच तारांगण या प्रकल्पाचेही काम अंतीम टप्प्यात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. महानगरांतर्गत रस्ते कामाकरीता आमचे नेते उध्दव ठाकरे सरकारने 80 कोटी रुपयांची तरतूद केली, परंतु निव्वळ आकसापोटी विरोधकांनी सत्तांतरानंतर त्यावर स्थगिती आणली. तो निधी अन्यत्र वळविला जाईल, हे लक्षात आल्याबरोबर स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेवून तो निधी अन्यत्र वळवू नये यासाठी याचिका दाखल केली. न्यायालयानेसुध्दा त्या संबंधिचा निर्णय दिला. त्यामुळे आता त्या रस्त्यांसह नाल्यांची कामे निश्‍चितपणे होणार आहेत. भर पावसाळ्यात कामे नकोत म्हणून त्यास कामांना संथ गती आहे, परंतु सर्व कामे निश्‍चितच पूर्ण होतील, अशी ग्वाही सौ. डहाळे यांनी दिली. विरोधकांनी टिका टिप्पणी करतेवेळी वस्तूस्थिती तपासली पाहिजे, आपले अज्ञान दाखवण्याऐवजी विरोधक म्हणून आपण शहरवासीयांसाठी काय केले, याचेही आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे आवाहन केले.

               सत्तेत आपण आहात, महापालिकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य करु शकला असता, दुर्देवाने सत्तारुढ असतांनासुध्दा विरोधकांना महापालिकेंतर्गत आयुक्तांच्या बेबंदशाहीवर लगामसुध्दा घालता आला नाही. संपूर्ण शहराची आयुक्तांनी वाट लावली असतांनासुध्दा सर्व सामान्यांच्या हितासाठी एक निवेदन सुध्दा देता आले नाही, अशी जोरदार टिका विरोधकांवर करतेवेळी सौ. डहाळे यांनी सर्वसामान्य जनता खूप हुशार आहे, कोण काय करतोय हे जनतेस ठावूक आहे, विरोधकांनी कोल्हेकुई केल्यापेक्षा आपण शहरवासीयांसाठी, जिल्हावासीयांसाठी नेमकं काय केलं, याचाही हिशोब द्यावा, असे आव्हान दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगरातून परभणीच्या भूमिगत गटात योजनेसह अन्य विकास कामांकरता रूपांचा निधी मंजूर केला त्या संदर्भात पुढे काय झाले याचा जाब सत्ताधारी पक्षाने द्यावा अशी ही त्या म्हणाल्या

परभणी जिल्हा प्रतिनिधी :गजानन साबळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button