महाराष्ट्र ग्रामीण

बेलदार सामाजिक संघटना कार्यकर्ते मिळून आरक्षण संदर्भात मनोज पाटील जरांगे यांना निवेदन

अकोला दी. 29
आज मनोज पाटील जरांगे यांची जालना येथील अंबड तालुक्यातील त्यांच्या निवास स्थानी अंतरवाली सराठी येथे अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे. युवा लॉयन्स सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हाध्यक्ष.पवनभाऊ सुखलाल जाधव यांनी व अन्य वेगवेगळ्या बेलदार सामाजिक संघटना कार्यकर्ते मिळून आरक्षण संदर्भात मनोज पाटील जरांगे यांना निवेदनदेत ” बेलदार समाजाला STमधून आरक्षण मिळावं या साठी युवा लॉयन्स सामाजिक संघटना महा. राज्य अकोला जिल्हाध्यक्ष पवनभाऊ सुखलाल जाधव यांनी पुढाकार घेत.जवळपास 25-30 मिनिटे चर्चा करून आरक्षण संदर्भात जरांगे पाटील यांच्याशी चर्चे दरम्यान बोलतांना बेलदार समाजा विषयी मागासले पणा संदर्भात उद्भवणाऱ्या अनेक समस्या वर बोलते वेळी भावना व्यक्त करत बेलदार समाजाला सुद्धा ST या कोट्या तुन आरक्षण मिळवून देण्यास आपण नेतृत्व स्वीकारून बेलदार समाजासाठी लढा उभा करावा आम्ही आपल्या सोबत आरक्षणाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून समर्थन देऊ असे मत व्यक्त करत मराठा आरक्षणाला आपला समर्थन देत.निवेदन देण्यात आले . मनोज पाटील जरांगे यांनी सुद्धा तो मुद्दा मनावर घेतला आणि टप्प्याटप्प्याने सर्व करू असे आश्वासन दिले. बेलदार समाजाचा मुद्दा त्यांच्या पुढच्या रणनीती मधे आहे. बेलदार समाज फक्त मतदाना पुरता मर्यादित न राहता आपल्या हक्कासाठी लढायला तयार असला पाहिजे. आता एकमताने सर्व समाज बांधवाने एकत्र येऊन आरक्षणाचा मुद्दा उचलणे गरजेचं आहे.अशी भावना व्यक्त करत बेलदार.सामाजिक संघटना यांना आस्वासन जरांगे पाटील यांनी निवेदन सादर करते वेळी दिले आहे.यावेळी निवेदन सादर करते वेळी सोबत, सुखलाल जाधव, अनंत गवई,सुहास खडसे,आशिष तायडे,
अर्जुन जाधव व आदी असंख्य बेलदार समाजातील कार्यकर्ते निवेदन देते वेळी अंतरवाली सराठी ता अंबड जालना या ठिकाणी उपस्थित होते…अशी माहिती प्रसार माध्यमाशी बोलतांना पवन सुखलाल जाधव युवा लॉयन्स सामाजिक संघटना महा. राज्य अकोला जिल्हाध्यक्ष यांनी दिली

मिथुन राठोड मूर्तिजापूर

https://www.facebook.com/mithun.rathod.184881?mibextid=ZbWKwL

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button