भीमशक्ती तर्फे मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची हकालपट्टीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन
भीमशक्ती तर्फे मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची हकालपट्टीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन
परभणी/ प्रतिनिधी गजानन साबळे शहरातील उपोषण मैदानावर आज सोमवार 12 ऑगस्ट रोजी भीमशक्ती सामाजिक संघटनाच्या वतीने महानगरपालिका च्या आयुक्त तृप्ती सांडभोर पदावरून हक्कलपट्टीच्या मागणीसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आली आहे तरी शहरात नागरिकासाठी कोणत्या ही मूलभूत सुविधा नाही या आंदोलनात घोषणाबाजी केली. या आंदोलनात निष्क्रिय महानगरपालिका च्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांची हकालपट्टी तात्काळ करा, शहरातून जायकवाडी कालवा( कॅनॉल ) घराच्या बाहेरून करण्यात यावा. गायरान जमिनी धारकाच्या नावे 7/12 वरील पोट खराब हा शब्द काढण्यात यावा. चौथी मागणी अशी की दोन वर्षापासून बंद असलेल्या नवीन घर पट्ट्या तात्काळ चालू करण्यात याव्या, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन केले. या आंदोलन भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विष्णू विजयकुमार सुखदेव, माजी महापौर व राज्य सरचिटणीस रवी सोनकांबळे, मराठवाडा महासचिव डॉ कनकुटे, जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, नितीन सावंत मराठवाडा उपाध्यक्ष, चक्रवती वाघमारे, शहरअध्यक्ष विक्रम काळे, सुहास पंडित, तात्याराव वाकळे, राहुल कनकुटे, अनिल सूर्यवंशी, प्रसाद गोरे, अभिनंदन मस्के, आदी सहभाग होते. यावेळी भीमशक्तीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने सहभाग होता.