आपला जिल्हा आपली बातमीपरभणी जिल्हा

भयंकर.. कार्यलयातच तलाठ्याची चाकूने भोसकून हत्या 

संतोष पवार( वय 36 ) असे मयत तलाठ्याचे नाव आहे.

भयंकर.. कार्यलयातच तलाठ्याची चाकूने भोसकून हत्या 

 

परभणी दि. 28 तुला मी फेरफारावरून तलाठ्याचा कार्यालयात चाकूने वार करत खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील आडगाव रंजीबुवा येथे बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.संतोष पवार( वय 36 ) असे मयत तलाठ्याचे नाव आहे.

 आधीची माहिती अशी की,हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांच्या कार्यक्षेत्रात बोरी सावंत येथील शिवार आहे. पवार हे बुधवारी आडगाव येथील त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना बोरी सावंत येथील प्रताप कराडे नामांक तरुणांनी कार्यालयात जात व्हाट्सअप ग्रुप वरील मेसेज वरून वाद सुरु केला. पवार यांनी मी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले.त्यानंतर प्रताप काळे नावाच्या युवकाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिरचीची पूड टाकत चाकूने अनेक वार केले. यावेळी तिथे असलेले शिकाऊ तलाठी बालाजी डावरे यांनी करायांना धरून चाकू डिस्काउंट घेत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कराळे यांनी पोबारा केला. नंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही बाब कळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्व महसूल अधिकारी कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकत्र आले होते सर्व अधिकाऱ्यासमोर पवार यांच्या कुटुंबाने ताऊ पडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केलीय. संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे संभाजीनगर इथून निघाले असून संतोष पवार यांच्या कुटुंबियांना ते भेट देणार आहेत. पोलिसांना यातील आरोपी प्रताप कराळे याला अटक केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button