बोरीच्या जैन वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान
कै.जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार 2
बोरीच्या जैन वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान
बोरी – (गजानन साबळे) येथील कै.जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार 2 0 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या वतीने सन 2022 -23 या वर्षाचा (ग्रामीण विभाग) क वर्गाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्काराचे वितरण एस. एन. डी. टी. महिला विद्यापिठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ,राज्य सभेचे माजी खासदार तथा जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांची उपस्थिती होती.
जैन वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. मीना जैन, सचिव बालाप्रसाद सोमाणी, उपाध्यक्ष पवन ओझा, सौ. प्रतिभा ओझा ,अभिषेक जंबुरे व ग्रंथपाल नेमीनाथ जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला.
शासनाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जैन वाचनालयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा परभणी प्रतिनिधी :गजानन साबळे