आपला जिल्हा आपली बातमीपुणे जिल्हासातारा जिल्हासोलापूर जिल्हा

चाकणच्या संतोषनगरमध्ये जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं युवा संवाद मेळावा पार पडला

अजितदादा पवार यांच्याशी युवकांना बातचीत करण्याची, त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळाली. 

चाकणच्या संतोषनगरमध्ये जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं युवा संवाद मेळावा पार पडला

प्रतिनिधी: राहुल साळुंखे

यावेळी नामदार अजितदादा पवार यांच्याशी युवकांना बातचीत करण्याची, त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळाली. 

 

जगामध्ये सर्वाधिक युवा संख्या ही आपल्या भारतात आहे. आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य व मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत समाजाला व युवकांना आधुनिक कौशल्य ज्ञान व प्रशिक्षण दिलं जात आहे. ४ लाख मुलामुलींना रोजगारासाठी जर्मनीला पाठवण्याची व्यवस्था आपण करत आहोत. जर्मनीत दोन लाख रूपये प्रतिमहिना वेतन राहणार आहे. इलेक्ट्रिशियन, मोबाईल रिपेअर करणारा, प्लंबर इत्यादी क्षेत्रात निपुण असणाऱ्या लोकांची गरज जर्मनीत आहे. त्यामुळे युवकांनी जिल्ह्याच्या कौशल्य व मनुष्यबळ विभागाच्या जिल्हा कार्यालयावर जाऊन अर्ज भरावेत असं आवाहन करतो. 

 

पंतप्रधान महोदयांच्या दृष्टीकोनानुसार, २०४७ पर्यंत भारत विकसित म्हणून उदयाला आला पाहिजे. तरुणाईत कला-कौशल्य वृद्धिंगत होवो, त्यासाठी तरुणांना अधिक पाठबळ देण्याचं काम सरकारं करत आहे. आम्ही शिक्षित युवकांना प्रशिक्षण भत्ता व प्रमाणपत्र देणार आहोत. प्रमाणपत्राचा वापर करून तुम्हाला खासगी क्षेत्रात नोकरी करता येणार आहे. प्रशिक्षितांबाबत आम्ही बँकेशी बोललो आहोत. प्रशिक्षित झालेल्यांपैकी कुणाला व्यवसाय करायचा असल्यास बँकेचं कर्ज उपलब्ध करून देण्यामध्ये सरकार पूर्णपणे सहकार्य करेल. 

एसटी, एससी, ओबीसी मागासवर्गीयांसाठी विदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती आम्ही उपलब्ध करून देत आहोत. ज्ञान व कौशल्य विकास या उपक्रमांतर्गत ५०० संस्थांचा विकास आपण करत आहोत. मॉर्डन आयटीआय जागतिक कौशल्य विकास केंद्र आपण उभा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button