डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,जनता विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर*येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न
वीद्यालयात आज दिनांक ८/०८/२०२४ गुरूवार रोजी इयत्ता ५वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री ए.एल. नंदन सर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मुल्हेरचे सरपंच निंबा भानसे, उपसरपंच श्री योगेश सोनवणे, माळीवाडे चे सरपंच काशिनाथ गवळी, जैतापूरचे सरपंच तात्याभाऊ चौरे, डांग सेवा मंडळाचे संचालक अनिल पंडित, पालक संघाचे उपाध्यक्ष शरद गांगुर्डे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल गर्गे, पर्यवेक्षक दिलीप जाधव, उपमुख्याध्यापक मधुकर मोरे हे उपस्थित होते. प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मागिल शैक्षणिक वर्षाच्या शालेय गुणवत्ता वाढीचा आढावा व विविध शालेय उपक्रमांची माहिती सी. जी. येवला यांनी मांडली. शिक्षकांच्या वतीने एम.ए.सुर्यवंशी, डी.पी.मोरे, एस.एस.मोरे, पी.आय.शेख, पर्यवेक्षक जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले त्यातून शाळेतील विविध परीक्षा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी च्या योजना यांची माहिती देऊन, पालकांनी शिक्षकांशी समन्वय साधावा ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवून जास्तीतजास्त गुणवत्ता वाढीस मदत होईल असे आवाहन केले. पालकांमधून श्रीकांत पंडित, वाळू गांगुर्डे, दिपाली बोरसे, प्रतिभाताई शेवाळकर, शरदकुमार गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी मांडलेल्या सर्व सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन प्राचार्य नंदन सर यांनी अध्यक्षीय भाषणातून दिले. कार्यक्रमास सर्व पालक शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.चंद्रकांत येवला यांनी केले.
Back to top button