आपला जिल्हा आपली बातमीवाशिम जिल्हा
ग्राम भट उमरा तालुका जिल्हा वाशिम येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने ग्रामस्थासी साधला संवाद .
सोनाली जोगदंड/लांडगे (माजी अध्यक्षा जिल्हा परिषद वाशिम) या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे तर संजय वैरागडे अध्यक्ष म्हणून उपस्थीत होते.
वाशिम – ग्राम भट उमरा तालुका जिल्हा वाशिम येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने ग्रामस्थासी संवाद साधला यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, मातंग समाजातील विचारवंत, गायक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनाली जोगदंड/लांडगे (माजी अध्यक्षा जिल्हा परिषद वाशिम) या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे तर संजय वैरागडे अध्यक्ष म्हणून उपस्थीत होते. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त सोनाली जोगदंड/लांडगे यांनी विविध गावांच्या भेटी घेत आहेत आणि समाजाच्या समोर मागणी करत आहेत की, यावेळी तरी मातंग समाजाला वाशीम मंगरूळपीर मतदार संघात राजकीय तसेच सामाजिक न्याय मिळणार का?