जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मैदानात जोडेमारो आंदोलन
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडेमारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मैदानात जोडेमारो आंदोलन
जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मैदानात जोडेमारो आंदोलन
आज गुरुवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 30 वाजेच्या सुमारास जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनाच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात महायुती सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडेमारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जे एम एस 16 अ संयुक्त मोजणी अहवाल प्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी आपली शेतजमिनी देणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनात रमेश माने , अमृतराव शिंदे , इर्शाद पाशा , प्रसाद गोरे , विष्णू इकर , रामप्रसाद इक्कर , डीगंबर पिंपळे , हरिभाऊ इकर , रामकिशन इक्कर , विजय खरात , मदन जाधव आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.