२६ जानेवारी हाच आमचा खरा स्वातंत्र्य दीन आहे..!
स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊंनी तर सांगितलेच होते "यह आजादी झुठी है देश की जनता भुकी है."
२६ जानेवारी हाच आमचा खरा स्वातंत्र्य दीन आहे..!
स्वातंत्र्याची व्याख्या करता येत नाही आणि ती होत सुद्धा नसते. स्वातंत्र्य हे देशातील जीवन जगणाऱ्या लोकांच्या अनुभवावर व जीवन जगण्याच्या प्रणालीवर ठरलेले असते मग आमच्या देशातील भटके, अस्पृश्य, ओबीसी यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर आपण जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की आजही या देशातील एसी एसटी ओबीसी भटके विमुक्त यांचे यांच्या जीवनात जो थोडाफार बदल दिसत आहे तो केवळ आणि केवळ विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आहे. नाहीतर स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊंनी तर सांगितलेच होते “यह आजादी झुठी है देश की जनता भुकी है.”
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४व्या जयंती निमित्त आज परभणी तालुक्यातील टाकळगव्हण येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून लखन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा परभणी प्रतिनिधी :गजानन साबळे