आपला जिल्हा आपली बातमीसातारा जिल्हा
लायन्स क्लब ऑफ देहूगाव च्या अध्यक्षपदी श्री विवेक काळोखे
लॉयन्स क्लब ऑफ देहूगावच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री विवेक वसंतराव काळोखे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी संदीप दिवानराव परंडवाल, खजिनदारपदी सतीश आवारी, सचिव पदी प्रथमेश अहिरे यांची कार्यकारणीवर निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ देहूगाव च्या अध्यक्षपदी श्री विवेक काळोखे
माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रवींद्र गोलार यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. क्लब मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सतीश आवारी ,वैभव नारळे, नीतू सिंग, संदीप परंडवाल, नारायण ब्रह्मा, किरण साळुंखे ,धनश्री काशीद, चंदनबाला दिघावकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष प्रकाश कांबळे,रिजन चेअरपर्सन शैलेजा सागळे, झोन चेअरपर्सन शशांक फाळके, यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य नागेश चव्हाण व श्रीक्षेत्र देहुगावचे नगराध्यक्ष, नगरसेवक ,ग्रामस्थ पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.