मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजना निरंतर सुरू राहणार-मंत्री आदिती तटकरे
मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजना निरंतर सुरू राहणार-मंत्री आदिती तटकरे
परभणी – गजानन साबळे लाडकी बहीण योजना ही काही मर्यादित काळीसाठीची योजना नसून ती निरंतर चालणार आहे. या योजनेत किमान अडीच कोटी महिला आपला सहभाग नोंदवतील. आतापर्यंत 1 कोटी 45 लाख महिलांनी या योजनेत आपला सहभाग नोंंदवला आहे. या योजनेला महिलांमधून मोठा प्रतिसाद मिळत असल्यानेच विरोधक गैरसमज पसरवत आहेत असा आरोप श्रीमती तटकरे यांनी केला आहे.
या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी महिला व बालविकास मंत्री श्रीमती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांचा संवाद मेळावा रविवारी परभणी येथे पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या मेळाव्याला आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, आनंद भरोसे, मंगला मुदगलकर आदींंची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेला महाराष्टातील सर्व माता भगिनींकडून उदंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यन्त एक कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांना या योजनेसाठी नोंदणी केली आहे.
या अर्जाची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आतापर्यंत 1कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र झाली आहे.
अदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र.
जिल्हा परभणी प्रतिनिधी :गजानन साबळे
ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588
खालील लिंक वर क्लिक करून लाईक आणि सबस्क्राईब करा.