निती आयोग द्वारा प्रमाणित यु एम सी ए फाउंडेशन जीवनदान ग्रुप नोंदणी अभियानाअंतर्गत स्वयंरोजगार, कन्यादान योजना, मायक्रो लोन, व इतर योजना चे आयोजन
अकोला जिल्हा समन्वयक समितीच्या वतीने फ्री सेमिनारचे आयोजन.
अकोला-(राजु पांढरे प्रतिनिधी) दि.२१ रोजी भारतीय निती आयोग द्वारा प्रमाणित यु एम सी ए फाउंडेशन जीवनदान ग्रुप नोंदणी अभियानाअंतर्गत स्वयंरोजगार, कन्यादान योजना, मायक्रो लोन, व इतर योजनांची माहिती देण्यासाठी अकोला जिल्हा समन्वयक समितीच्या वतीने फ्री सेमिनारचे आयोजन दिनांक २५ ला दुपारी एक वाजता स्थळ- बाबा हरदास राम भवन गुरुनानक विद्यालयासमोर मेन रोड सिंधी कॅम्प अकोला येथे आयोजित केले आहे.
यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ऍड .नरेंद्र बेलसरे साहेब( उपाध्यक्ष अकोला बार असोसिएशन )तसेच प्रमुख मार्गदर्शक -मा श्री के एल शरणागत साहेब मध्य प्रदेश व महाराष्ट्र समन्वयक यु एम सी ए फाउंडेशन तसेच माननीय सुनीलजी चंदनशिव विदर्भ समन्वयक व माननीय रवी अहिरराव नागपूर समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे .
तरी इच्छुक लाभार्थी यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे अकोला जिल्हा आयोजक समीती यु एम सी ए फाउंडेशन व जीवनदान ग्रुप समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.