पीक विमा योजनेबाबत बैठकनु कसानग्रस्त शेतक-यांना तत्काळ भरपाई द्यावी- जिल्हाधिकारी अजित कुंभार
पीक विमा योजनेबाबत बैठकनु कसानग्रस्त शेतक-यांना तत्काळ भरपाई द्यावी– जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. २ : प्रतिनिधी मिथुन राठोड पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित मिळावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.
नियोजन भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी आ.अमोल मिटकरी, आ. प्रकाश भारसाकळे,आ.हरीश पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे,मुर्तीजापूर उपविभागीय अधिकारी संदीप पवार, तहसीलदार शिल्पा बोबडे आदी उपस्थित होते.
2023-24 हंगामातील पिक विमा योजनेतील तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात. तसेच अपात्र दाखवण्यात आलेल्या प्रकरणांची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या.
यावेळी आ.हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजने संदर्भातील अडचणी मांडत पिक विमा प्रतिनिधींनी तपासणी करून त्वरित अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्यात तर आ. प्रकाश भारसाकळे यांनी पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असून एकही पात्र शेतकरी त्यापासून वंचित राहू नये याबाबत विमा प्रतिनिधींना निर्देश दिलेत.आ.अमोल मिटकरी यांनी शासनाच्या योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
सर्व पात्र शेतक-यांना विहित मुदतीत नुकसानभरपाई देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.