परभणी जिल्हा
पिकविम्याच्या मागणीसाठी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन कीर्तन आंदोलन
पिकविम्याच्या मागणीसाठी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन कीर्तन आंदोलन
आज शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघर्ष समितीचे इर्शाद पाशा यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण मैदानात भजन कीर्तन आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी 2023 हंगामातील हरभरा आणि तूर पिकाला कापणी पश्चात पीकविमा द्यावा तसेच सोयाबीन, कापूस आणि इतर पिकाचा पीकविमा द्यावा आदी मागण्यांसाठी आज भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.