प्रदेश अध्यक्ष राज क्षिरसागर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा- अण्णाभाऊ साठे क्रांती सेना
अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेशअध्यक्ष राज क्षीरसागर व त्यांच्यासोबत असलेले समाज बांधवावर हल्ला.आरोपी मात्र मोकाट, पोलीस प्रशासन बेजाबदारपणामुळे आरोपी बाहेरच.
प्रदेश अध्यक्ष राज क्षिरसागर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा- अण्णाभाऊ साठे क्रांती सेना.
नांदेड – किशोर कवडीकर (प्रतिनिधी)अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 30 जून 2024 रोजी अण्णाभाऊ साठे चौक लातूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत विकास सतीश कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेशअध्यक्ष राज क्षीरसागर व त्यांच्यासोबत असलेले समाज बांधवावर हल्ला करण्यात आला यामध्ये चाकू, तलवार, बेल्ट, व रॉड च वापर करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले यामध्ये आकाश शिवाजी लोंढे, विकास लोंढे, नारायण जोगदंड,सूरज लोंढे यांचा समावेश आहे, सदरील घटने संदर्भात लातूर गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पण दीड महिन्यापासून या घटनेतील मुख्य आरोपी विकास सतीश कांबळे व त्यांचे सहकारी अद्याप फरार असून त्यांना अटक करण्यात आले नाही , म्हणून आज नांदेड येथे अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संघटनेच्या वतीने पोलिस महानिरीक्षक साहेबाना सदरील घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले,यावेळी उपस्थीत अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेश अध्यक्ष राज क्षीरसागर,मराठवाडा सचिव किशोर कवडीकर,नांदेड मराठवाडा उपाध्यक्ष विलास झिंजोरे, नांदेड जिल्हा अध्यक्ष पंडित वाघमारे,मालोजी वाघमारे, अविनाश आंबटवाड, संतोष आंबटवाड, प्रल्हाद राहेरे,संभाजी मस्के, संजय कदम, उतम कसबे, रवि क्षिरसागर, सचींद्र कांबळे, सूरज लोंढे,बालाजी कलवले , गजानन काळेकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..