पशुधन विकासातून पशुपालकांची आर्थिक उन्नती होणार: डॉ. सुनिल लहाने
https://24newsnetwork.live/wp-content/uploads/2024/08/
पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळा संपन्न
अकोला, दि. 24 ; शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होऊ शकते.त्यामुळे पशुपालकांमध्ये पशुसंवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आज इथे केले.ते पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉलमध्ये जि,प.मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्या अध्यक्षतेत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, सहयोगी अधिष्ठाता स्ना.प.स प्रा.डॉ. चैतन्य पावशे,सहयोगी अधिष्ठाता,कृषि महाविद्याल,डॉ. राजेंद्र गाडे,अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेंद्र अरबट,पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, शेतकरी व पशुपालक आदी उपस्थीत होते.
श्री.डॉ.लहाने यांनी पशुपालकांमध्ये नवउद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत असून पशुपालन हे उद्योग क्षेत्र म्हणून आज विकसित होत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. अनिल भिकाने यांनी वैरण विकास कार्यक्रम,पशुधन अभियान, डीपीआऱ,ऑनलाईन अर्जपद्धती, पशुधन विमा, चारा व्यवस्थापन मूरघास निर्मिती, शेळीपालन यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
जि.प.जि,प.मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये पशुपालकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन पशुधन विकास अधिकारी डॉ.स्नेहल पाटील यांनी केले.