सात दिवसाच्या आत ना हरकत रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार
सात दिवसाच्या आत ना हरकत रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार
दारूच्या दुकानासाठी दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी.
सात दिवसाच्या आत ना हरकत रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार.
रिसोड (प्रतिनिधी – जियाऊर खान) गजानन टॉकीज समोरील कृषी उत्पन्न च्या कॉम्प्लेक्स मधील देशी दारूचे दुकान स्थलांतर करून पोस्ट ऑफिस समोरील नरवाडे कॉम्प्लेक्स मध्ये सुरू करण्याचा ना हरकत प्रमाणपत्र नगरपरिषद रिसोड चे प्रशासक श्री सतीश शेवदा यांनी दिले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदरहू ठिकाणी सामाजिक दृष्ट्या दुकान सुरू करणे अपायकारक असून भविष्यात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोक्याचे आहे कारण सदरहू रस्त्यावर गावातील लोकांना, महिलांना बाहेरगावी जाण्याकरिता बस स्टॅन्ड वर जाणारा एकमेव रस्ता आहे तसेच तिथूनच प्रशासकीय कामा करिता तहसील कार्यालय जवळ असल्यामुळे महिलांची खूप गर्दी असते व जवळच शाळा असल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी ला जाण्याचा एकमेव रस्ता आहे अशा परिस्थितीत त्याच रस्त्यावर देशी दारूचे दुकान सुरू झाल्यास एखाद्या मद्यपीने एखाद्या महिलेसोबत नशेच्या धुंदीत अपरिचित घटना घडविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासक म्हणून श्री सतीश शेवदा यांची राहील असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदात म्हटले आहे जर सात दिवसात सदरहू ना हरकत रद्द न झाल्यास वंचित बहुजन आघाडी महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या व जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष, महासचिव, तालुकाध्यक्ष यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे
निवेदन देते वेळेस मोहम्मद आसिफ शहराध्यक्ष सय्यद अकिल भाई तालुकाध्यक्ष,प्रा. रंगनाथ धांडे सर जिल्हा उपाध्यक्ष, जियाऊर खान रिसोड महासचिव, शेख खाजा उपाध्यक्ष, अभिषेक Spend जिल्हा अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन सय्यद नाजीम उपाध्यक्ष, , शुभम सावंत युवा महासचिव, साबेर शहा, अक्षय सपकाळ तालुकाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, शेख परवेज, शेख इमरान, राहुल खंडारे, वैभव कुरे, सतीश धवसे, सुमित तपोणकर, रियान शेख, प्रतीक चव्हाण, सुरज दाभाडे, अजित कळासरे, शुभम फुलारे, विशाल मानमोठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.