शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवू – खासदार सुप्रिया सुळे
परभणीत राष्ट्रवादीचा शिक्षक संवाद मेळावा संपन्न
शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवू – खासदार सुप्रिया सुळे
परभणीत राष्ट्रवादीचा शिक्षक संवाद मेळावा संपन्न
परभणी
राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून काही शिक्षकांना कित्येक वर्षे काम करूनही अजून पगार मिळालेला नाही यासह जुन्या पेन्शन योजनेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिक्षकांसाठी चांगली पॉलिसी आणण्यासाठी चांगल्या लोकांना निवडून देण्याची गरज आहे आणि आपल्या विचारांचे सरकार राज्यात आणले पाहिजे, असे प्रतिपादन संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांशी संवाद साधताना केले.
येथील जिंतूर रोडवरील अन्नपुर्णा लॉन्समध्ये रविवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलतर्फे शिक्षक संवाद मेळावा संपन्न झाला. राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी हा मेळावा आयोजित केला होता.
शिक्षक संवाद मेळाव्यास विशेष अतिथी म्हणून संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांची उपस्थिती राहणार होती, मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टर ला परवानगी न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर, श्री.विजयराव भांबळे, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ.विजयराव गव्हाणे, शहर जिल्हाध्यक्ष जाकेर अहमद खान, राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे, जुनी पेंशन योजनेचे राज्य सचिव गोविंद उगले, शहर जिल्हा कार्याध्यक्ष विकास लंगोटे , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रदुमन टोंग , रवि देशमुख सर आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परभणी प्रतिनिधी :गजानन साबळे