समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देवू -मा. खासदार अँड सुरेश जाधव यांचे प्रतिपादन
या बाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्याची शेतकऱ्यासोबत बैठक
समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देवू -मा. खासदार अँड सुरेश जाधव यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी गजानन साबळे परभणी
या बाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्याची शेतकऱ्यासोबत बैठक
परभणी :- नांदेड परभणी जालना मार्गी जात असलेल्या समृद्धी महामार्ग बाधित परभणी जिल्यातील शेतकऱ्यांना त्याच्या शेतजमिनीचा बाजार भावा प्रमाणे योग्य मोबदला मिळून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू आणि संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देवू असे प्रतिपादन माजी खासदार तथा शिंदे गटाचे परभणी जिल्हा सपंर्कप्रमुख अँड सुरेश जाधव यांनी केले.
या बाबत आज दि. 23/8/2024रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यलयात अँड. सुरेश जाधव यांच्या ने्तृत्वात जिल्हयातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. नांदेड -जालना समृद्धी महामार्ग परभणी जिल्ह्यातून जात असून परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांची जमीन या प्रस्तावित महामार्गसाठी बाधित होत आहे. परभणी जिल्हयातील सर्व जमिनी या बागायती व ओलीताखाली असल्याने आणि वास्तविक बाजारभाव हा जास्त असताना देखील शेतकऱ्याच्या या जमिनी शासन कवडी मौल भावाने विकत घेत आहे.या बाबत शेतकऱ्याच्या मनात प्रचंड असंतोस निर्माण झाला आहे.
समृद्धी महामार्गत जात असलेल्या जमिनीचा योग्य मोबदला व वाढीव मावेजा शासनाकडून देण्यात यावा या मागणीसाठी परभणी जिल्हयातील सुमारे (200) शेतकऱ्यांनी आज मा. खासदार अँड सुरेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाअधिकाऱ्यची भेट घेवून आपल्या संतप्त भावना व्यकत केल्या
या संदभात पुढील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कडे संबंधित शेतकऱ्याचे शिष्टमंडळ भेट घेणार असून संबंधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यंकडून न्याय मिळवून देवू असे मा. खासदार सुरेश जाधव यांनी सांगितले