विहिरीमध्ये उडी मारून नितनवरे यांची आत्महत्या. अद्यापही कारण स्पष्ट समजू शकले नाही.
राजु शंकरराव नितनवरे (वय-50) यांनी विहीर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.२२), दुपारी 3, वाजता उघडकीस आली.
विहिरीमध्ये उडी मारून नितनवरे यांची आत्महत्या.
अद्यापही कारण स्पष्ट समजू शकले नाही.
बोरी/प्रतिनिधी
येथील राजु शंकरराव नितनवरे (वय-50) यांनी विहीर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.२२), दुपारी 3, वाजता उघडकीस आली.
या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्याने दिली दिल्यानंतर पोलीस व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून विहिरी मधून प्रेत काढून पंचनामा केला.
व शवविच्छेदन साठी बोरी ग्रामीण रुग्णाला दाखल करण्यात आले.
बोरी गावातील संभाजीनगर येथील रहिवासी राजु नितनवरे वर 50 हे मिस्त्री काम करून उपजीविका करत होते. बुधवारी दुपारी 3 वाजता कोक शिवारातील परभणी – जिंतूर रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहीर उडी घेऊन आत्महत्या केली.राजु नितनवरे यांच्या पश्चात पत्नी व चार मुली आहेत. आत्महत्यांचे कारण समजू शकलेले नाही.बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.