अपरिचित इतिहास

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानुसार प्रारूप याद्या प्रसिद्ध मतदारसंख्येत 13 हजार 429 मतदारांची वाढ

User Rating: 1.25 ( 1 votes)

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानुसार प्रारूप याद्या प्रसिद्ध
मतदारसंख्येत 13 हजार 429 मतदारांची वाढ
दि. 20 ऑगस्टपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
अकोला, दि. 6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्‍दी जिल्‍हा, उपविभागीय, तसेच तहसील कार्यालये येथे करण्‍यात आली आहे. मतदान केंद्रस्‍तरीय अधिका-यांकडेही प्रारूप यादी उपलब्‍ध आहे. या प्रारूपावर दि. 20 ऑगस्टपूर्वी दावे, हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी दि. 30 ऑगस्ट रोजी प्रसिध्‍द होईल.

प्रारूप यादीनुसार आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 4 एप्रिल 2024 रोजी निश्चित मतदार संख्‍येत एकूण 13,429 इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे.

प्रारूप मतदार यादीनुसार मतदारसंख्या
अ.क्र. मतदार संघ क्रमांक व नांव दिनांक 06/08/2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या
प्रारुप मतदार यादीनुसार मतदार संख्‍या
पुरुष स्‍त्री इतर एकूण
1 28-अकोट 158043 144151 4 302198
2 29-बाळापुर 156395 145865 1 302261
3 30-अकोला (पश्चिम) 170370 168064 22 338456
4 31-अकोला (पुर्व) 176362 167326 15 343703
5 32-मुर्तिजापुर (अ.जा.) 155819 145872 5 301696
एकूण…. 816989 771278 47 1588314

सर्व मतदारांनी मतदार यादीची तपासणी करुन सर्व मतदारांनी आपली नावे समाविष्‍ट असल्‍याबाबत व त्‍यातील तपशील योग्‍य असल्‍याबाबत खात्री करावी. ज्‍या मतदारांची नांवे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट नाहीत अशा पात्र मतदारांनी आपले नांव नोंदविण्‍यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे आवश्‍यक पुराव्‍यांसह विहीत नमुना 6 सादर करावा अथवा मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्‍यात आलेल्‍या voters.eci.gov.in या संकेत स्‍थळाचा / voter helpline या App चा ऑनलाईन अर्ज भरण्‍यासाठी वापर करावा.
त्‍याचप्रमाणे मयत किंवा कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची नांवे वगळणी करणेकरीता विहीत नमुना 7 भरुन द्यावा, मतदारांच्‍या मतदार यादीमधील तपशीलामध्‍ये दुरुस्‍ती करणे, पत्‍ता बदलणे, नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळविणे इत्‍यादी साठी आवश्‍यक पुराव्‍यांसह विहीत नमुना 8 मध्‍ये अर्ज संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी/ मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे सादर करता येईल.
मतदार यादीमध्‍ये नाव समाविष्‍ट असलेल्‍या दिव्‍यांग मतदारांना मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित केलेल्‍या सक्षम ॲपव्‍दारे दिव्‍यांग असल्‍याबाबतची नोंद करता येऊ शकते. याचा उपयोग दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्राचे ठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याकरीता होईल. मतदार यादीमध्‍ये नांव समाविष्‍ट असलेल्‍या ज्‍या मतदारांनी त्‍यांच्‍या मतदार यादीमधील नोंदीशी त्‍यांचा आधार क्रमांक संलग्‍न करुन अद्याप सदर नोंदीचे प्रमाणीकरण केलेले नाही, त्‍यांनी विहित अर्ज भरुन मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडे / तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्‍या कार्यालयात सादर करावा. सदरची कार्यवाही दिनांक 20/08/2024 पर्यंत करता येईल.
काही मतदार केंद्रांत बदल
पुनरिक्षण पुर्व कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरणाच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मतदान ज्‍या मतदान केंद्रांवर 1500 पेक्षा अधिक मतदार संख्‍या होण्‍याची शक्‍यता होती अशी मतदान केंद्रे विभागुन नवीन मतदान केंद्रे तयार करण्‍यात आली आहेत, काही मतदान केंद्रांच्‍या इमारतीचे नाव बदलल्‍यामुळे मतदान केंद्रांच्‍या नावामध्‍ये बदल करण्‍यात आला आहे तसेच काही मतदान केंद्रांच्‍या इमारती मोडकळीस/नादुरुस्‍त अथवा वापरण्‍यायोग्‍य नव्‍हत्‍या अशा मतदान अशी मतदान केंद्रे नजीकच्‍या अन्‍य इमातीमध्‍ये स्‍थलांतरीत करण्‍यात आले आहेत याप्रमाणे कार्यवाही करण्‍यात आली आहे. ज्‍या मतदारांचे मतदान केंद्र बदलले आहे अशा मतदारांना संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी यांचेमार्फत लेखी कळविण्‍यात येणार आहे. मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरणाच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे बदल करण्‍यात आलेला आहे-

अ.क्र. मतदार संघ क्रमांक व नाव मतदान केंद्र सुसुत्रीकरण कार्यक्रमापूर्वी असलेली मतदान केंद्रांची संख्‍या मतदान केंद्रांचे स्‍थान बदल मतदान केंद्रांच्‍या नावात बदल 1350 पेक्ष अधिक मतदार संख्‍या झाल्‍याने लगतच्‍या मतदान केंद्रास जोडलेले मतदान केंद्र नव्‍याने प्रस्‍तावीत मतदान केंद्रांची संख्‍या एकूण मतदान केंद्रांची संख्‍या
1 2 3 4 5 6 7 8(3+7)
1 28-अकोट 336 15 13 11 10 346
2 29-बाळापूर 340 3 0 0 7 347
3 30-अकोला (पश्चिम) 307 43 0 38 0 307
4 31-अकोला (पूर्व) 351 11 0 6 0 351
5 32-मुर्तिजापूर (अ.जा.) 385 9 0 8 5 390
एकूण 1719 81 13 63 22 1741

करिता 1 जुलै 2024 या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या अकोला जिल्‍ह्यातील सर्व नागरीकांनी मतदार यादीमध्‍ये नाव नोंदणी करावी, कोणताही पात्र व्‍यक्‍ती मतदार यादीमध्‍ये नांव समाविष्‍ट करण्‍यापासून वंचित राहू नये असे आवाहन जिल्‍हाधिकारी अजित कुंभार केले आहे.

००००

मिथुन राठोड मूर्तिजापूर

https://www.facebook.com/mithun.rathod.184881?mibextid=ZbWKwL

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button