अहमदनगर जिल्ह्यामध्ये निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी रिसोड ने केला निषेध.
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या निलेश राणे विरुद्ध रिसोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात यावा अशा प्रकारची केली मागणी.

प्रतिनिधी रिसोड जियाऊर खान
एक सप्टेंबर ला अहमदनगर जिल्ह्यामध्ये रामगिरी महाराजांच्या समरणार्थ निघालेल्या रॅलीमध्ये भाजपा आमदार यांनी जाहीर सभेमध्ये मुस्लिम धर्मीय लोकांना गांडू या शब्दाचा उच्चार करून त्या समाजाविरुद्ध अर्वाच्य भाषेचा उपयोग करून शिवीगाळ केली तसेच मस्जिद मध्ये घुसून एकेकाला मारू अशा प्रकारची धमकी सुद्धा दिली त्यांच्या अशा वक्तव्याने संपूर्ण मुस्लिम समाजाची भावना दुखावली आहे असे वक्तव्य करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून जातीय दंगल घडविण्याचे काम करीत आहे अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून अशा प्रकारचे वक्तव्य कोणीही करणार नाही अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडी रिसोड शहर व तालुक्याच्या वतीने रिसोड पोलीस स्टेशन येथे देण्यात आला आहे तसेच गुन्हा नोंदविण्यात नाही आला तर वंचित बहुजन आघाडी व रिसोड येथील मुस्लिम समुदाया तर्फे सवैधानिक मार्गाने रास्ता रोको किंवा धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद केले आहे निवेदन देते वेळेस वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व रिसोड शहरातील व तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते.