बागलाण तालुक्यातील जामोटी येथील महिला सरपंच वंदना पोपट ठाकरे यांना तिसरे अपत्य असल्याने,
कायदेशीर कारवाई होऊन त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी
बागलाण तालुक्यातील जामोटी येथील महिला सरपंच वंदना पोपट ठाकरे यांना तिसरे अपत्य असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी
ग्रामपंचायत सदस्य सकूबाई रोडू साबळे इतर सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली सविस्तर माहिती वंदना पोपट ठाकरे हया 05/07/2023 रोजी जामोटी ग्रामपंचायतिच्या थेट सरपंच पदी निवडून आल्या परंतु त्यानी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देऊन निवडणूक जिकंली दोन पेक्षा अधिक मुले असलेली येक्ती निवडणूक लढण्यास अपात्र ठरते महिला सरपंचांस एकूण अपत्य 3 अनुक्रमे 1)कार्तिक जन्म 26/12/2017 (2)सृष्टी जन्म 19/12/2020(3) अनन्या जन्म 4/12/2022 सदर महिला सरपंचांने आपली तिसरी मुलगी अनन्या ही आपल्या पतीच्या भावाच्या नावाने नोंद केली आहे महिला सरपंच वंदना पोपट ठाकरे यांचे पती पोपट मनिराम ठाकरे हे माजी सरपंच आहेत ते सरपंच असताना त्यांनी आपल्या मुलींची नोंद भाऊ विजय मनिराम ठाकरे यांची वडील म्हणून ग्रामपंचायत रेकॉर्ड नोंद केली पदाचा दुरुपयोग राजकीय दबाव तंत्रचा वापर हे कट कारस्थान केले सदर महिला सरपंच यांचे गरोदरपणातील व प्रसूती काळातील नोंद 01/01/2022 मध्ये गर्भा अवस्थेची खेप तिसरी असे दाखविण्यात आले आहे सरपंच वंदना पोपट ठाकरे यांचे पती पोपट मनिराम ठाकरे हे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संचालक म्हणून निवडून आलेले आहेत त्यानी ही चुकीची माहिती देऊन निवडणूक जिकंली त्याचे ही संचालक पद अपात्र करण्यात यावे दोघं पती पत्नी यांच्या वर खोटी माहिती दिल्या बद्दल कादेशीर गुन्हा दाखल करुन पदावरून पायउतार करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सखूबाई रोडू साबळे व सदस्यांनी केली आहे तालुका प्रतिनिधी श्याम मोरे