आपला जिल्हा आपली बातमी

खेडभाळवणी ता. पंढरपूर येथील पाझर तलाव ही योजना दुरूस्तीकरण सन २०२३-२०२४ करिता ठेकेदाराने बेकायदेशीररित्या मुरूम उपसा केल्याने त्याची सीबीआयकडू न चौकशी व्हावी

 

मौजे खेडभाळवणी ता. पंढरपूर येथील पाझर तलाव ही योजना दुरूस्तीकरण सन २०२३-२०२४ करिता ठेकेदाराने बेकायदेशीररित्या मुरूम उपसा केल्याने त्याची सीबीआयकडू न चौकशी व्हावी .

पंढरपूर -मौजे खेडभाळवणी ता. पंढरपुर येथील पाझर लाव ही योजना दुरूस्ती करणे सन २०२३-२०२४ करिता लघुपाटबंधारे यांच्यावतीने ठेकेदार पांडुरंग मजूर सहकारी संस्था मर्यादित सोनके ता. पंढरपूर यांनी काम चालू केले आहे. त्याकरिता पाझर तलावातील गाळ व काही भागातील मुरूम बाहेर काढून दुसरीकडे बेकायदेशीरपणे नेण्यात आलेला आहे. ही सर्व कामे नाममात्र परवानगी घेवून १५ दिवसांपासून चालू आहेत. २ जेसीबीच्या माध्यमातूनप्रति दिवस सुमारे १२ टॅक्टर बेकायदेशीरपणे मुरूम व गाळ काढून नेण्यात आलेला आहे. मुरू्म हा काही ठिकाणी रानात व रस्त्यावर वापरण्यात आलेला आहे. याबाबतचे फोटो व व्हीडीओ शुर्टीग आमच्याकडे उपलब्ध आहे. या बेकायदेशीर कृत्यामध्ये मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम सेवक सरपंच यांनी संगनमताने मुरमाचा उपसा करणाच्यास अर्थपूर्ण संबंधाने पाठीशी घातलेले आहे त्यामुळे शासनाचा महसूल बुडालेला अहे. सदस्चा उपसा केलेल्या मुरूमापैकी काही मुरूम हा खेडभाळवणी छत्रपती शिवाजी नगर रस्ता २) सटवाई देबी रस्ता ३) मस्के वस्ती रस्ता अशा तीन ठिकाणच्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेला आहे. कारण वर उल्लेख केलेल्या रस्यावर मुरूम टाकलेला आहे तसेच अणखी किती मुरूम कुठे टाकण्यात आलेला आहे किंवा दुसरी कडे बेकायदेशीर नेण्यात आला.यांची शासन ने सखोल चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.
सांगोला विधानसभाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे नाव सांगून, बेकायदेशीर मुरमाचा उपसा सुरू आहे.याबाबत कोणी विचारणा केल्यास,त्यांना आमदाराचे नाव सांगून,गप्प केले जाते. सदरच्या प्रकारास लघु पाटबंधारे विभाग पूर्णत जबाबदार आहे. त्यामुळे गौण खनिज संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. व शासनाचा महसूल ही बुडवला आहे.त्या वरील सर्व जबाबदार असून,त्यामुळे यांच्यावर कार्यवाही करुन सीबीआय चौकशी करण्यात यावी. व सबंधित वर दंडात्मक कार्यवाही करावी.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button