श्री क्षेत्र उद्धव महाराज समाधी येथे नामसप्तःह समिती व लोक सहभागातून महाप्रसादाचे आयोजन
श्री क्षेत्र उद्धव महाराज समाधी येथे नामसप्तःह समिती व लोक सहभागातून महाप्रसादाचे आयोजन…
मुल्हेर येथे श्रीउद्धव महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन केले जाते यात अठरा पगड जाती धर्मातील लोक सकाळी आरती,उद्धव महाराज चरित्र पारायण,भजन कीर्तनाचे व अखंड पहार्याचे भक्त्जनांकडून उद्धवा चरणी सेवा रुजू केली जाते. नाम सप्ताहाची सांगता बुधवार दि.१८ सप्टेबर ला होणार असून त्यानिमित्त गावातील,आजूबाजूच्या ४० खेड्यातील लोक या येथे जमत असतात शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते.नाम साप्ताह सांगता हि श्री उद्धव महाराज यांच्या पालखी मिरवणुकीने केली जाते या निमित्त मुल्हेर ला बोहाडा (रामलीला) तीन दिवसचा सादर केला जातो.या समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील चव्हाण,सचिव शेखर पंडित,सदस्य बळवंत गायकवाड,तुळशीराम जगताप,दत्ता तिवारी,सुरेश बत्तीसे,सतीश शुक्ल,बापू कुटे,रामचंद्र खरे,भिका बागुल,सरपंच निंबा भान्से,उपसरपंच योगेश सोनवणे,बन्सीलाल बत्तीसे,प्रतिक येवला,संजय उपासनी,पंडित जगताप आदी ग्रामस्थ उत्सवात परिश्रम घेत आहेत.