सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे जवळ जवळ चाळीस वर्षा पासून ची परंपरा
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे जवळ जवळ चाळीस वर्षा पासून ची परंपरा
आहे. येथे विविध मंडळानकड़ून गणेश उत्सव साजरा केला जातो.सर्व समाज बांधव यात भाग घेतात. त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जीवंत देखावे सादर केले जातात त्यातून महाभारत रामायण,तसेच अंधश्रद्धा वरील तसेच कारगिल युद्ध सारखे जीवंत देखावे सादर करतात.रात्री पंचक्रोशितिल भाविक भक्त दर्शनासाठी येतात व मनसोक्त आनंद घेतात.असे देखावे नाशिक जिल्ह्यात फक्त मुल्हेर यथेच पहावयास मिळतात..एकता गणेश मित्र मंडळ ,नवयुवक गणेश मंडळ, काशीराज गणेश मंडळ क्षत्रीय गणेश मित्र मंडळ,सार्वजनिक गणेश मित्र मंडळ,असे सर्व मित्र मंडळ खूप मेहनत घेऊन सादरीकरन करतात.व दर्शकांच्या कौतुकास पात्र ठरतात.तसेच अनंत चतुर्दशी च्या रात्री पासून तीन दिवस उद्धव महाराज जयंती निमित्त पारंपरिक उत्सव भोवाड़ा(रामलीला) ला सुरवात होते यंदा च्या वर्षी 16 सप्टेबर पासून ते 18 सप्टें.पर्यन्त भोवाड़ा उत्सव राहिल याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.या उत्सव साठी गावातून नामसप्ताह कमिटी.उद्धव महाराज समाधि संस्थान.ग्रामपंचायत मुल्हेर व गावकरी..सर्व आपापल्या परीने मेहनत घेतात
मेहमुद मन्सूरी