तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश मिळवत जनता विद्यालय मुल्हेर च्या 49 खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
नुकत्याच सटाणा येथे झालेल्या बागलाण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेरच्या 49 विद्यार्थ्यांनी विविध खेळात घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यात 14 वर्षे वयोगटात तनिष्क पाटील- थाळीफेक, गणेश पवार -गोळा फेक, ललित माळीच व विशाल बागुल- बांबुउडी
17 वर्षे वयोगटात मोहिनी अहिरे – 400 मीटर धावणे, आकाश गायकवाड, भरत अहिरे, सप्तिका निकम – 3000 मीटर चालणे, दिव्या बागुल, यामिनी अहिरे, आकाश गायकवाड – उंच उडी, शौर्य बोरसे – लांब उडी, निलेश पवार, संकेत पवार, वर्षा गवळी, पूजा मोरे, 110 मीटर हडल्स, सर्वजीत पडाळकर, कुणाल गांगुर्डे, अविका शर्मा, नेहा सूर्यवंशी – हॅमर थ्रो, निलेश पवार, महिमा चौधरी पूजा मोरे बांबुऊडी, आकाश गायकवाड – 400 मीटर हडर्ल्स
19 वर्षे वयोगटात – जयमाला बर्डे 100 मीटर धावणे व भालाफेक, आचल सोनवणे 200 मीटर धावणे, शकीला पवार 400 मीटर धावणे, वैशाली अहिरे उंचउडी, दिपाली सूर्यवंशी 3000 मीटर चालणे, पवन गायकवाड 5000 मीटर चालणे, विशाल पवार – लांबउडी, सुनील चौधरी उंचऊडी, निखिल कुटे – भालाफेक, उध्दवेश जगताप थाळीफेक, गोळा फेक व हॅमर थ्रो, दिपाली सूर्यवंशी – थाळीफेक, आकाश चौधरी – हॅमर थ्रो, विशाल पवार, पवन गायकवाड, जयमाला बर्डे, अंजली पवार – 110 मीटर हर्डल्स, शत्रुघ्न चौरे, विशाल पवार, आचल सोनवणे, कुसुम माळचे – 400मीटर हर्डल्स, रोहित भानसे व सुनिल चौधरी बांबुउडी या सर्व विजयी खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री अंकुश पाठक यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंचे संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, उपाध्यक्ष दामोदर ठाकरे, सचिव अँड.मृणाल जोशी, संचालक अनिल पंडित, प्रभाकर पवार, अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण चंद्रात्रे, प्राचार्य अशोक नंदन, उपमुख्याध्यापक मधुकर मोरे, पर्यवेक्षक दिलिप जाधव, सरपंच निंबा भानसे, उपसरपंच योगेश सोनवणे, पालक संघाचे उपाध्यक्ष शरद गांगुर्डे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.