पुण्यातल्या बावधन बुद्रुक या भागात हेलिकॉप्टर कोसळले; यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे
आज सकाळी पुण्यातील चांदणी चौकापासून जवळच असलेल्या बावधन बुद्रुक या भागात ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट मधे हेलिपॅड आहे; या हेलिपॅडहून मुंबईतील जुहूच्या दिशेने हे खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर निघालेले असताना सकाळी साडेसातच्या सुमारास उडान घेतल्यानंतर काही मिनिटातच हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळले. या परिसरात सकाळच्या सुमारास दाट धुके असल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये दोन पायलट सह एका इंजिनियरचा दुर्दैवीपणे मृत्यू झालेला आहे.या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस आणि त्या नंतर डॉक्टरांची टीम ही घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नक्की कशामुळे झाला कारण समजू शकले नाही; परंतु हा अपघात सकाळी दाट धुके असल्यामुळे झाला; की अन्य काही कारण आहे याची चौकशी पोलिसांकडून आता सुरू झाली आहे. यात पूर्ण चौकशी करून दोषी असलेल्या वरती योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गजानन सूर्यवंशी
24 न्यूज नेटवर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी