Baba Siddique Firing Youth injured : सहा गोळ्यांपैकी एक गोळी रस्त्याने जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या पायात घुसली. या व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे.
राज कनोजिया (२२) असे त्याचे नाव असून, त्याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात गोळीबार झाला. यावेळी हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा गोळ्यांपैकी एक गोळी रस्त्याने जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या पायात घुसली. या व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहेगोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटातील व्हिडिओ समोर आला आहे. २२ वर्षांचा राज कनोजिया जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसत आहे. जवळच असलेल्या श्रीराम मंदिरात तरुणाला ठेवण्यात आलं. त्याच्या आजूबाजूला पोलीस आणि नागरिकांची गराडा पाहायला मिळत आहे.काय आहे प्रकरण?
वांद्रे येथे बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी देवीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी जाणाऱ्या एका तरुणाच्या पायाला लागली. राज कनोजिया (२२) असे त्याचे नाव असून, त्याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्याच्या काकांनी दिली.राज हा वांद्रे परिसरात शिंपी म्हणून काम करतो. दसरा असल्याने दुकान बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याला मित्रांनी देवीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी बोलावले होते. खेरवाडी सिग्नल परिसरातून जात असताना अचानक गोळीबार झाला. बेसावध असलेल्या राजच्या पायाला यातील गोळी लागली आणि तो खाली कोसळला. याबाबत माहिती मिळताच त्याचे मित्र मदतीला धावले. पोलिसांच्या वाहनातून त्याला भाभा रुग्णालयात नेण्यात आले.भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर राजच्या पायातील गोळी काढण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असून, अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात आणल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. राज हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहत आहे सिद्दीकींची हत्या बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत हत्या झाली. वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर उपचारासाठी त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वांद्रे पश्चिममधून तीन वेळा आमदार राहिलेले सिद्दिकी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.