आपला जिल्हा आपली बातमीरायगड नवी मुंबई ताज्या बातम्या घडामोडी

Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू, दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक, माजी मंत्र्याच्या हत्येने खळबळ.

Baba Siddique Shot Dead: वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू, दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक, माजी मंत्र्याच्या हत्येने खळबळ Baba Siddique Shot Dead: वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर ही घटना घडली. गोळीबारानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. SRA प्रकल्पातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी सिग्नलनजीक आमदार झिशान सिद्दीकी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर तिघांनी बाबा सिद्दिकींवर ६ राऊंड गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला लागली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी दाखल करण्यापूर्वीच डॅाक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. तीन गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचे वृत्त कळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल माहिती दिली असून बाबा सिद्दिकींवर तिघांनी गोळीबार केला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण हरियाणा तर दुसरा उत्तर प्रदेशमधील आहे. तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लिलावती रुग्णालयात आले.

बाबा सिद्दिकी यांचे मुळ नाव झियाउद्दीन सिद्दिकी असे आहे. १९७७ साली अगदी लहान वयात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीमध्ये होते. ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे सदस्य होते. ८०मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस करण्यात आले तर चार वर्षांनी ते वांद्रे युवक काँग्रेस अध्यक्ष झाले. १९८८ साली त्यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . त्यानंतर ४ वर्षांनी म्हणजे १९९२ साली ते मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक झाले. १९९२ आणि १९९७ अशी दोन टर्म ते नगरसेवक होते. बाबा सिद्दिकी यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे १९९९, २००४, २००९ अशी सलग तीन टर्म प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री (२००४-२००८) म्हणून काम केले होते. महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाच्या अध्यक्षपदी बाबा सिद्दिकी यांची नियुक्ती केली होती. ते २००० ते २००४ या काळात या पदावअभिषेक घोसाळकरांच्या गोळीबाराची आठवण

 

राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याची मुंबईतील गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह करताना गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, यात घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button