बुधवारी जिंतूर शहरातील वाहतुकीस बदल गृहमंत्री अमित शहा यांची सभा पोलीस अधीक्षक रवींद्र श्री परदेशी यांचे आदेश
परभणी महायुती भाजपाचे उमेदवार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांची सभा.
बुधवारी जिंतूर शहरातील वाहतुकीस बदल गहमंत्री अमित शहा यांची सभा
पोलीस अधीक्षक रवींद्र श्री परदेशी यांचे आदेश
(प्रतिनिधि गजानन साबळे)
परभणी महायुती भाजपाचे उमेदवार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांची सभा बुधवार 13 नंबर रोजी दुपारी दोन वाजता जिंतूर ते परभणी रोडवर साई मंदिर येथे होणार असल्याने जिंतूर शहरातील वाहतात बदल करण्यात आला आहे बुधवारी सकाळी 11 ते सकाळी सहा पर्यंत वाहतूक बंद अमलात राहील याबाबत पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी १२ नोव्हेंबरला आदेश काढले आहे.
जिंतूर शहरातून हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी वाहतूक अवजड व खाजगी प्रवासी वाहनांच्या रहतीसाठी बंद करण्यात आली आहे अवजड वाहनांनी जिंतूर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करणारे प्रवास यांची अशा वळण रस्त्यांचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत जालना कडून जिंतूर कडे किंवा पुढे औंढा नागनाथ कडे जाणारी अवजड वाहने ही देवगाव फाटा येथून जिंतूर कडे न येता सेलू पाथरी पोखरणी शिंगणापूर फाटा ताडकळस पूर्ण मार्गे जातील जालना मार्गे जिंतूर कडे किंवा पुढे औंढा नागनाथ कडे जाणारी खाजगी वाहने देवगाव फाटा येथून सेलू मानवत रोड पेडगाव परभणी कडून जातील जालना मार्गे जिंतूर व हिंगोली कडे जाणारी अवजड वाहने मंटा लोणार लोणी रिसोड सेनगाव मार्गे हिंगोली कडे जातील परभणी शहरातून जिंतूरमार्गे चालण्याकडे जाणारी वाहने पेडगाव मानवत रोड सेलू देवगाव फाटा मार्गे जाते हिंगोली कडून जिंतूर कडे येणारी वाहने औंढा नागनाथ झिरो फाटा परभणी ताडकळस पूर्णा मार्गे जातील
सभेसाठी वाहन पार्किंग परभणी कडून येणाऱ्या नागरिकांसाठी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे वाहन उभारण्यात आले आहे. देवगाव फाटा कडून येणारी वाहने वट्टमवार यांच्या प्लॉटमध्ये उभे करण्यात येणार आहेत. तर जिंतूर शहरातून सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी जिल्हा परिषद शाळा व बस स्थानक समोर वाहन तर उभारण्यात आले आहे औंढा रोड येणाऱ्या वाहनांसाठी पॉईंट व लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे वाहन तर उभा करण्यात आले आहे