MLA Dr.Rahul Patil: परभणीत डॉ. राहुल पाटील विजय
परभणी विधानसभा 34 हजार 214 मताचे मताधिक्य आनंद भरोसे यांना 92 हजार 577
MLA Dr.Rahul Patil: परभणीत डॉ. राहुल पाटील विजय
परभणी विधानसभा 34 हजार 214 मताचे मताधिक्य आनंद भरोसे यांना 92 हजार 577
परभणी (MLA Dr.Rahul Patil.): गजानन साबळे परभणी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांचा34 हजार214 मतांनी विजय झाला.
प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांना 92 हजार577 मते पडली तर विजयी उमेदवार आ.डॉ. राहुल पाटील(MLA Dr Rahul Patil) यांना 1 लाख26 हजार 791 मते पडली. आ. डॉ. राहुल पाटील यांनी परभणी विधानसभेतून विजयाची हॅट्रिक साधली.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून वनामकूवीतील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मत मोजण्यात आले. यामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना 1 हजार 920 मते पडली. आनंद भरोसे यांना 1 हजार 226 मते पडली. परभणी विधानसभेत मतमोजणीच्या 25 फेऱ्या झाल्या. अंतिम मजमोजणीनंतर आ. डॉ.राहुल पाटील यांना 1 लाख 26 हजार 711 मते पडली. तर आनंद भरोसे यांना 92 हजार 577 मते पडली. आ. डॉ .राहुल पाटील(MLA Dr.Rahul Patil) यांचा निवडणुकीत विजय झाला आहे.