नांदगाव तालुक्यातील राजुरा शेतशीवाराच्या विहीर मध्ये आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह.
एक इसम उबड्या अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व खाली निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला दिसून आला आहे.
नांदगाव तालुक्यातील राजुरा शेतशीवाराच्या विहीर मध्ये आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह
नांदगाव खंडेश्वर / सागर सव्वालाखे
दिनांक 9/ 11/ 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता दरम्यान यातील शेतमालक विजय प्रकाश शिंगाने, राजुरा यांनी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे माहिती दिली की, राजुरा येथील त्यांचे मालकीचे शेतात आज रोजी सकाळी 6.00 वाजता दरम्यान त्यांचे शेतात काम करणारा मजूर अशोक तुकाराम भांडेभुचे रा राजुरा हे शेतातील विहिरीजवळ पाणी पाहण्याकरता गेले असता विहरीत त्यांना एक इसम उबड्या अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व खाली निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेलादिसून आला आहे.
सदर इसमाचे वय हे अंदाजे 25 ते 30 वर्ष असल्याचे दिसून येते. तसेच सदरचा मृतदेह हा कुजलेला असल्याने त्याच्या अंगावर कोणतेही ओळख चिन्ह दिसून आले नाही.
वरील इसमा बाबत माहिती मिळून आल्यास खालील मोबाईल क्रमांक वर संपर्क करावे.
पो स्टे नांदगाव खं 07221222641
पो नि सोळंके 9823616171
पो उप नि तुळजेवार 7768869977