आपला जिल्हा आपली बातमीपुणे जिल्हापुणे जिल्हा ठळक घडामोडी

नवी सांगवीकरांचं ठरलंय; आमचं मत चिंचवडच्या विकासालाच.. म्हणजेच शंकर जगताप यांना चागलं प्रतिसाद मिळाला

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी परिवारजनांशी संवाद साधला

नवी सांगवीकरांचं ठरलंय; आमचं मत चिंचवडच्या विकासालाच.. म्हणजेच शंकर जगताप यांना चागलं प्रतिसाद मिळाला 

पुणे. जिल्हा प्रतिनिधीउमेश पाटील 

चिंचवड: दि.7 नोव्हेंबर 2024 नवी सांगवीमध्ये आज (गुरुवारी) झालेल्या भव्य प्रचार रॅलीदरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी परिवारजनांशी संवाद साधला, आणि त्यांचे विजयासाठी आशीर्वाद घेतले.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील बंधू भगिनी आणि सर्व सामान्य जनता ही कायम माझ्या हृदयात आहे. आणि त्यांचे स्थान कायम तसेच राहील. त्यांच्या या विश्वासामुळेच लढण्याची ताकत मला मिळाली आहे. त्यांनी प्रेमाने आणि उत्साहाने माझे स्वागत केले. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात माय बाप जनतेच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून मी सर्वसामान्यांचे वे प्रश्न सोडवणार असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले.

सत्रात नवी सांगवी येथे निघालेल्या प्रचार रॅलीत एम के चौक, समता नगर, गणेश नगर, कीर्ती नगर, समर्थ नगर, आदर्श नगर मधील चैत्रबन सोसायटी, सरस्वती पार्क या ठिकाणी नागरिकांशी भेटी गाठी घेत मतदारांशी घराघरात जाऊन संवाद साधला. माता-भगिनींकडून त्यांना औक्षण केले जात होते.

या प्रचार रॅलीमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ काबळे, बळीराम जाधव, सौ. शीतल आगरखेड, कविता निखाडे, सूर्यकांत गोफणे, बाबुराव शितोळे, प्रशांत कडलक, बाळासाहेब पिल्लेवार, सुरेश तावरे, डॉ. देविदास शेलार, सखाराम रेडेकर, राजू नागणे, राजू पाटील, आप्पा पाटील, शामराव पताडे, संदीप दरेकर, राजू मोरे, सुनील कोकाटे, गणेश बनकर, उमेश झरेकर, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, शिवशरण टेंगळे, बसवराज हिरेमठ, जयसिंग जाधव, अभय नरवडेकर, अमित घोडसाळ, चंद्रकांत बेडे, संजय मराठे, साई कोंढरे, लालासाहेब ढोरे, शिरीष कवडे, संतोष पाटील, ज्ञानेश्वर खैरे, सचिन खराडे, सभाजी ढवळे, विशाल खैरे, संभाजी भेगडे, गिरीश देवकाते, भरत पेठे, विक्रम भेगडे, मनीष भापकर, राजेश साळुंखे, पवन साळुंखे, प्रवीण जाधव, सुभाष पावर, अशोक कवडे, अविनाश खुटे, प्रवीण पाटील, योगेश कदम, ललित म्हसेकर, शैलेश जाधव, मनीष रेडेकर, विकी रेडेकर, विशाल गायकवाड, संतोष पाटील, रामदास पोखरकर, भाऊसाहेब जाधव, स्वींद्र रासने, रविकुमार चौधरी, प्रवीण देवासी, श्रीकांत पवार, गोविंद मुखणे, अमित कानडे, बोरसे सर, योगेश कदम यांच्यासह नवी सागवीतील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग, युवा वर्ग भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button