पाथरी निवडणुकी संदर्भात आरंभ अचुक वार्तांकन
पाथरी निवडणुकी संदर्भात आरंभ अचुक वार्तांकन
परभणी/पाथरी (Pathari Election Results) : (गजानन साबळे परभणी)विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून पाथरी विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडी संदर्भात अंदाज बांधत दैनिक आरंभ परभा मधून वेळोवेळी केलेले वार्तांकन अचूक झाल्याचे दिसून आले. १७ सप्टेंबर रोजी दै. आरंभ परभा मध्ये (Pathari Election Results) पाथरी मतदारसंघात सिंगल टर्म पॅटर्न या मथळ्याखाली केलेल्या राजकिय वार्तापत्रात पाथरी विधानसभा मतदारसंघात २००९ च्या पंचवार्षिक निवडणुकीपासून दर पंचवार्षिक निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी दिल्या जात असल्या संदर्भात वार्तांकन करण्यात आले होते.
सोबतच यावेळी ऐनवेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीत महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. राजेश विटेकर हेच उमेदवार असतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी वार्तापत्रातुन (Pathari Election Results) निवडणुकी दरम्यान निर्माण झालेली परिस्थिती संदर्भात केलेले विश्लेषण ही निकालामधून अचूक दिसून आले. या संदर्भात वाचकांमधून संपूर्ण निवडणुकीदरम्यान दै. आरंभ परभा मधुन निष्पक्ष भुमिका, अचूक अंदाज व विश्लेषण झाल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.