पिंपळे गुरवच्या विकासाला अधिकची गती देण्यासाठी शंकर जगताप यांना मतरूपी आशीर्वाद द्या – आमदार अश्विनी जगताप
पिंपळे गुरवच्या विकासाला अधिकची गती देण्यासाठी शंकर जगताप यांना मतरूपी आशीर्वाद द्या – आमदार अश्विनी जगताप
पुणे: (उमेश पाटील )चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव, प्रभाग क्र.२९ मधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शंकर जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला, त्यांचे विकासाचे वचन जनतेसमोर मांडले आणि मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “आपला विश्वास, आपला विकास” या विचारधारेखाली त्यांनी नागरिकांना शंकर जगताप यांच्या रूपात एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष प्रतिनिधी मिळेल यासाठी आश्वस्त केले.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव प्रभागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी सुदर्शन नगर, वैदू वस्ती, गुलमोहोर कॉलनी, पिंपळे गुरव परिसरतील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, माजी नगरसेविका उषा मुंडे, चंदा लोखंडे, रमेश जगताप, रमेश काशीद, महेश जगताप, दीपक काशीद, राहुल जवळकर, कावेरी जगताप, शोभा जांभुळकर, अमर आदियाल, शशिकांत दुधारे, नितीन कदम, राजेश लोखंडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
“चिंचवडच्या प्रगतीसाठी, आपल्या सर्वांची साथ हवी” अशी साद आमदार अश्विनी जगताप यांनी नागरिकांना घातली. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या क्षेत्रात केलेले प्रयत्न आणि योगदानामुळे हा परिसर आज विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे यापुढेही असाच विकास अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना मोठे मताधिक्य देऊन त्यांना काम करण्याची संधी देण्याचे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले.
या दौऱ्या दरम्यान अश्विनी जगताप यांनी स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांशी संवाद साधला. शंकर जगताप यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात चिंचवडमध्ये अधिक सकारात्मक बदल घडतील याची जाणीव करून दिली.