५६ टेबलवर होणार मतमोजणीच्या ११८ फेऱ्या
शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
५६ टेबलवर होणार मतमोजणीच्या ११८ फेऱ्या
शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
परभणी : (प्रतिनिधी गजानन साबळे) सार्वत्रिक विधानसभा
निवडणुकीची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होईल. जिल्ह्यातील चारही विधानसभेत ५६ टेबलवर मतमोजणीच्या ११८ फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गुरुवारी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप जिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची उपस्थिती होती.
मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास परवानगी नाही. मतमोजणी परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुरविलेल्या पासेस किंवा इसीआयकडील पासेस असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
जिंतूर विधानसभेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मतमोजणी होणार असून १४ टेबलवर मतमोजणीच्या ३२ फेऱ्या होतील. पोस्टल मतमोजणी ७ टेबलवर होईल. परभणी विधानसभेसाठी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय वनामकृवि येथे मतमोजणी होणार आहे.
या ठिकाणी १४ टेबलवर मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतील. ६. टेबलवर पोस्टल मतदानाची मोजणी होईल. गंगाखेड विधानसभेसाठी संत जनाबाई महाविद्यालय कोद्री रोड येथे मतमोजणी होणार असून १४ टेबलवर मतमोजणीच्या ३१ फेऱ्या होतील. पोस्टल मतमोजणी ८ टेबलवर होईल. पाथरी विधानसभेत १४ टेबलवर मतमोजणीच्या ३० फेऱ्या होतील. ७ टेबलवर पोस्टल मतमोजणी होईल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाथरी येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी करीता नेमण्यात आलेले मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि सुक्ष्म निरीक्षक यांचे रॅण्डमायझेशन करण्यात आले असून विधानसभा निहाय कर्मचारी नेमणुका करण्यात आल्या आहेत